मुंबई : सुपारी देऊन शिवसेनेची (Shivsena)  हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत  त्यांनी हे वक्तव्य केली. आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या शिवसेनेसाठी सर्वात कठीण प्रसंग आहे. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आहे. बाळासाहेबांच्य मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असं बोलले जात होते. पण आपण जिंकलो. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्यचा प्रयत्न केला आहे. भाजपच तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही.  आता जर जागे नाही झालो तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल.  मिंधे गटाला नाव आणि चिन्हं दिले. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार आणि शिवसेना संपवायचा प्लॅन आहे. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह वापरू शकतो हे चिन्ह जरी काढून घेतले तर अजून दहा चिन्हे माझ्या मनात आहेत


निवडणूक आयोगाचा निर्णय आणि भविष्यातल्या रणनीतीबाबत बैठकीत चर्च होण्याची शक्यता आहे.   ठाकरेंचे प्रमुख नेते येत्या काळात महाराष्ट्र दौरा करणार  आहेत.  गाव तालुका जिल्हा पिंजुन काढायचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिले आहे. आधी नेते दौरा  करणार  त्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे जाणार दौ-यावर जाणार आहेत.  विभागवार ठाकरेंच्या प्रमुख नेत्यांचे दौरे  ठरणार  आहे.  दौ-यांवर जाऊन ठाकरे गट आपला गड मजबुत ठेवण्याचा  प्रयत्न करणार आहे.


शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील जिल्हा प्रमुख यासोबतच संपर्क प्रमुख यांची बैठक सुरू  आहे.  पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं दोन अभियान राबवले जाणार आहे.  बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि शाखा संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  पक्षाची पडझड रोखून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे गट अभियान राबवणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.


उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात जिल्हा प्रमुख, संपर्कप्रमुख,सहसंपर्कप्रुख आणि विभागप्रमुखांची पुढील रणनीतीसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आका उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले लोक मोठ्या ताकतीने प्रयत्न करणार असल्याचं ते सांगतात. सुरुवातीला पक्षात पडलेली फुट यानंतर पक्षाचं गेलेलं नाव आणि चिन्ह... यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आहे ते सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट कामाला लागला आहे. त्याला आता किती यश मिळतं हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.