Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विदर्भ (Vidarbha ) आणि मराठवाड्यातील (Marathwada) सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी यावेळी मार्गदर्शन केलं. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणाले आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीने सिंदूर पंतप्रधानांना पाठवा असेही ठाकरे म्हणाले. जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, निवडणुका कधीही लागू शकतात. स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा, आघाडी की युती? यासंदर्भात स्थानिक पातळीवरील आपलं मत मांडा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या
स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकर निर्णय घ्या, मतदार याद्या आतापासून तपासा आणि त्यावर त्याचवेळी तक्रारी करा, मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे येण्याची शक्यता
येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे देखील दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले होते. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असे सचिन अहिर यांनी म्हटले होते. सचिन अहिर हे 'एबीपी माझा'च्या न्यूजरुममधील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या राजकीय मिलनाविषयी महत्त्वाची टिप्पणी केली.
महत्वाच्या बातम्या: