Uddhav Thackeray : जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या. 20 वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवा, मनसेसोबत चर्चा सुरू आहे, युतीचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही तयारीला लागा असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज मुंबईत शाखाप्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. 

Continues below advertisement


उद्धव ठाकरेंनी नेमकं बैठकीत नेमकं काय म्हणाले?


जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या, 20 वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. सर्व वॉर्डमध्ये आपल्या पक्षाची तयारी ठेवा, मनसेसोबत चर्चा सुरू आहे मनसेच्या युती संदर्भात निर्णय आम्ही घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या. फार तर फार 100 दिवस उरलेत कामाला लागा. भूलथापांना बळी पडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचा आहे, भाजपने आपला पक्ष आणि चिन्ह चोरल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजप आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतात? लक्षात घ्या, टीकेला फक्त ठाकरेच लागतात याचे महत्त्व समजून घ्या असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जे आपल्याला सोडून गेले आणि परत येतील त्यांना उमेदवारी मिळणार नाही आपापसातले हेवे दावे विसरा असेही ठाकरे म्हणाले. 


गेल्या दोन महिन्यात चार वेळा ठाकरे बंधू एकत्र


गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील कटूता कमी झाली असून तब्बल चार वेळा उभय बंधूंमध्ये गेल्या दोन महिन्यात भेट झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सामोरे जातील अशी चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात शिवतीर्थ या राजठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती.  यावेळी दोघांमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.  विविध अंगानी ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब बोललं जात आहे. दरम्यान, या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित होते. मात्र, संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलं होतं. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार का? याकडे सुद्धा लक्ष असणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!