Meenatai Thackeray statue : मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात असणाऱ्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर (meenatai thackerays statue)  लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सध्या शिवाजी पार्क परिसरात फॉरेंसिक एक्सपर्टची टीम दाखल झाली आहे. फेकलेल्या रंगाचे पाच सॅंपल गोळा करण्याचं काम सुरु आहे. तसेच जमिनीवरच्या रंगाचे सॅंपल, चौथाऱ्यापर्यंतचे सॅंपल, पुतळ्यावरीलही काही सॅंपल हस्तगत केले आहेत.  

Continues below advertisement

दरम्यान, या घटनेनंतर मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. आज पहाटे दादरच्या शिवाजी पार्क येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकला होता. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांनी निषेध व्यक्त केला असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहेत.

24 तासात आरोपीला अटक करा, राज ठाकरेंनी दिला अल्टिमेट

दरम्यान, या घटनेनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. राज ठाकरेंनी 24 तासात आरोपीला अटक करा असं अल्टिमेट पोलिसांना दिल्याने प्रकरणाचं गांभिर्य वाढलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला जातोय, पण सध्या पोलिसांकडून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना या परिसरात काटेकोर पद्धतीने लक्ष ठेवण्याचं आदेश दिले जात आहेत. 

Continues below advertisement

बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रचंड मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray On Meenatai Statue: मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे...