Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या झात आहेत. पण, याचवेळी कधी नव्हे एवढ्या खालच्या पातळीवर राज्याचं राजकारण जाऊन पोहचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्यातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका करतांना चक्क कुत्र्यांची उपमा देण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत टीका करतांना याचा उल्लेख केला जात आहे. एखाद्या गाडी खाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते, आणि त्यानंतर एकमेकांना कुत्रे म्हणण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. 


तुम्ही कुत्रे, दिल्लीत जाऊन शेपटी हलवतात : संजय राऊत 


फडणवीस यांच्या याच टीकेला उत्तर देतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, "गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) कुत्र्याचं पिल्लू आहे का, अभिजीत घोसाळकरांची पत्नी त्याची लहान मुलगी, त्याचे माता-पिता ही कुत्र्याची पिल्ले आहेत का?, कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले. 


पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नयेत: नितेश राणे 


संजय राऊत यांनी टीका केल्यावर त्यांच्या टीकेला लगेचच भाजप नेत्यांकडून उत्तर देण्यात आले. याची सुरवात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. “महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक! ...ऊबाठातील आपसी गैंगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंदी करायला लागेल!... असे नितेश राणे म्हणाले.


आयुष्यभर शरद पवारांसमोर शेपटी हलवली : प्रसाद लाड 


नितेश राणे यांच्यानंतर लगेचच भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. “संजय राऊत यांना मी सांगतो की, ज्याने आयुष्यभर शरद पवार यांच्यासमोर शेपटी हलवली. त्याला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही. ज्यावेळी राज्यत उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी या राज्यात गांडूचं राज्य होते. ज्यात हिरे हत्याकांड, दिशा सायलन हत्याकांड असेल, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण असेल, एका उद्योजकाच्या घराबाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल, लेडीज बारमधून 100 कोटी जमा करण्याचा प्रकार असेल, हे तेव्हाचं गांडू सरकार करत होते. त्यामुळे गृहखाते कसे चालवायचं हे संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नयेत. त्यामुळे यापुढे फडणवीसांबद्दल बोलल्यास यापेक्षा खालच्या पातळीवर उत्तर दिले जाणार असल्याचे, प्रसाद लाड म्हणाले आहेत. 


दिल्लीश्वेर समोर कुत्र्यासारखी शेपटी हलावतात : उद्धव ठाकरे 


दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "फडणवीस यांना कलंक, फडतूस शब्द वापरले आहे. आता माझ्याकडे शब्दच नाही. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का?, श्वान गाडीखाली आल्यावर राजीनामा देऊ का असे फडणवीस म्हणत आहेत. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर कुत्र्यासारखी शेपटी हलावतात, असे ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करावी लागेल; नितेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका