मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट उद्या (22 फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजता सुनावणी पार पडणार आहे.
ठाकरे गटासाठी मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे, उद्या दुपारी 3.30 वाजता घटनापीठ यावर निर्णय घेईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरेंच्या याचिकेची सुनावणी पार पडणार आहे. थोडक्यात आज सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली नसली तरी उद्या मात्र यावर सुनावणी होणार हे नक्की आहे. याचिका आम्ही पूर्णपणे वाचलेली नाही, त्यामुळे उद्या दुपारी या संदर्भात सुनावणी घेण्यात येणार आहे. शिंदे गटाची वकिल कौल म्हणाले, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नाही. यापूर्वी देखील ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र दोनदा हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यावर आता या प्रकरणावर चर्चा नको, उद्या दुपारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या याचिकेचे मेन्शनिंग करण्यास काल सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागितलेय. यावर काल तात्काळ सुनावणीस सुप्रीम नकार दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती.
आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाही
तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण तर ठाकरेंकडून हिरावलं गेलं. चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेना मिळाला. पण आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाहीय. ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरतं होतं. निकालात आयोगानं स्पष्ट म्हटलं आहे की, हे तात्पुरतं नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्यानं प्रक्रिया करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :