Maharashtra Budget Session : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मराठी भाषा भवनासंदर्भात (Marathi Bhasha Bhavan) बैठक बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यासह मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. तसेच अन्य मंत्री देखील उपस्थित होते. केसरकर शिंदे गटात गेल्यानंतर प्रथमच दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे समोरा-समोर आल्याचे पाहायला मिळालं. महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेल्या आराखड्यात काहीही बदल करणार नसल्याचं दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.


मविआच्या आराखड्यात बदल करणार नाही : केसरकर


मराठी भाषा भवनासंदर्भातील बैठकीसाठी मंत्री दीपक केसरकरांसह उद्धव ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह अन्य विधिमंडळ सदस्य बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मराठी भवनाच्या बांधकामाबाबत असलेल्या तांत्रिक बाबींवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी सरकारनं बनवलेल्या आराखड्यात काही बदल करणार नसल्याचे दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाच्या कामाबाबत काही सूचना दिल्या आहेत. या सर्व मागण्यांवर सकारत्मक विचार करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले. 


हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात झाला होता वाद 


दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद झाला होता. उपसभापतींच्या दालनातच हा वाद झाला होता. बंडखोरीच्या संदर्भात दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते. या प्रसंगानंतर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. या वादानंतर आता उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर मराठी भाषा भवनासंदर्भातील आयोजित बैठकीत एकमेकांसमोर आले.


देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची एकत्र एन्ट्री


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या (23 मार्च) दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Budget Session : विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय