सातारा : सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे काही गोष्टींचे शौक निराळेच असतात. त्यांनी आज नुकतीच पुण्यातून बीएमडब्लू गाडी विकत घेतली. पुण्यातील बवेरीयन मोटर्स प्रा. ली. येथीन त्यांनी बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. या गाडीचा नंबरही त्यांच्या नेहमीच्या म्हणजेच जेम्स बॉन्ड नंबरशी निगडीत....007.


 उदयनराजेंना गाड्यांवर भलतच प्रेम आहे.  त्यांच्याकडच्या प्रत्येक गाड्यांचा एक इतिहासच झाला असे म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी त्यांच्या जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केले ते जिप्सी. जिप्सी काही काळ वापरल्यानंतर त्यांनी लगेचच महिंद्रा कंपनीची त्यावेळची थार गाडी विकत घेतली. त्यानंतर टाटा सियार, टाटा इस्टेट, स्क्रार्पिओ, मर्सडिज, ऑडी, सफारी, पजेरो, अशा असंख्या गाड्यांचा शौक त्यांनी पूर्ण केला. सध्या त्यांच्याकडे फोर्ड इंडीवर MH 11 AB 007 ही गाडी होती. त्यानंतर त्यांनी बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही आज पुण्यातून खरेदी केली. 




उदनराजेंचा राजकारणापेक्षा जास्त ओढ हा महाविद्यालयात शिकत असताना वाहनांमध्ये आणि रेसिंग मध्ये होता. त्यांचे शिक्षण परदेशात ऑटोमोबाईल इंजिनियरींगमधू झाले. शिवाय लंडनमधून त्यांनी एमबीए देखील केले. या कालावधीत त्यांना छंद लागला तो रेसिंगचा. लंडन, जर्मनी, फ्रान्स या देशात ते कामयच रेसींगच्या ट्रॅकवर दिसत होते.




त्यांच्या या छंदाचा धसका त्यांच्या आजी म्हणजेच राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी घेतला होता. त्यामुळे त्याच्या बद्दल त्या त्यांना कायमच टोकत होत्या. तर दुसरीकडे वडिलांचे म्हणजेच प्रतापसिह महाराजांचे  उदयनराजेंच्या कमी वयात वडिलांचे छत्र हरपल्यामुळे राजमाता कल्पनाराजे ह्या कायमच त्यांच्याबद्दलची काळजी करत होत्या. शिवाय त्यांनी शिक्षण संपल्यानंतर लवकरच भारतात यावे असा आग्रह त्यांच्याकडून झाला.




 


 उदयनराजे जेव्हा भारतात म्हणजेच साता-यात आले. तेव्हा ते आपोआपच राजकारणात गुरफटत गेले आणि त्यांना त्यांचा गाड्यांचा आणि रेसिंगचा छंद हा कालांतरानंतर मनातच दाबून ठेवावा लागला. ही मनातील खंत मात्र ते अनेकवेळा आपल्या जवळच्या मित्रांसोबत कायमच शेअर करत असतात. परंतु आजही एखादा भारदस्त वाहन त्यांच्या हातात आले तर ते सातारा शहराबरोबर कास परिसरात फिरायला जातात. आता त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर त्यांचा शौक ते पुरा करतात यात शंका नाही. तसही त्यांच्या गाडी चालवण्यावर चांगले चांगले ड्रायवरही फिदा होतात यात शंका नाही.