पाथरी तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैधरित्या वाळू वाहतूक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. बिनबोभाट आणि राजरोसपणे वाळूची वाहतूक केली जात असताना कारवाया होत नव्हत्या. 1 मार्च रोजी पहाटे 1 च्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी आर टिपलवड आणि त्यांचे पथक कोबिंग ऑपरेशन करत असताना जायकवाडी वसाहत परिसरात एक ट्रक अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना आढळून आला. या पथकाने हा ट्रॅक थेट पाथरी पोलीस ठाण्यात आणला. त्यावेळी टिपलवड गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असताना गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भगीरथ जाधव, हरिभाऊ पवार यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांलाच गुन्हा दाखल करू नये यासाठी रोखण्यात आले.
अरेरावी आणि हमरीतुमरीवर गेलेला प्रकार थेट शिवीगाळ पर्यंत गेला. पोलिस ठाण्यात घडलेली घटना सी सी टीव्ही मध्ये आली. हा प्रकार घडल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक टिपलवड यांनी घटनेची नोंद थेट पोलीस डायरीत केली. त्यानंतर टिपलवड यांनी याबाबतचा अहवाल पोलीस निरीक्षक यांनाही दिला होता. परंतु 4 मार्च रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल भगीरथ जाधव आणि हरीभाऊ पवार या दोन्ही कर्मचाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी प्रकाश एकबोटे करत आहेत.
बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी तहसीलदारांनी पेटवल्या | सोलापूर | एबीपी माझा
संबंधित बातम्या :
बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांना हरित लवादाचा दणका
उजनी धरणातून वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी पाण्यातच उडवल्या!