संसदेच्या दोन्ही सभागृहात दिल्ली हिंसाचारावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. शिवाय लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून ती भिरकावली. यामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सात खासदारांवर कारवाई केली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन, गुरजीत सिंह यांचा समावेश आहे.
निलंबनानंतर कॉंग्रेसचे खासदार म्हणाले, 'आम्हाला दिल्ली हिंसाचाराविषयी फक्त संसदेत आवाज उठवायचा होता'. बुधवारी कॉंग्रेस खासदारांचा एक गट राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दंगलग्रस्त भागात गेला होता, ज्याचा अहवाल त्यांना संसदेत मांडायचा होता. ते म्हणाले, 'सरकारला सभागृहात दिल्लीतील हिंसाचाराबद्दल बोलायचे नाही'.
होळीनंतर सरकार दिल्ली हिंसाचाराबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी कॉंग्रेस गेल्या चार दिवसांपासून करत आहे. दिल्ली हिंसाचाराविषयी सभागृहात कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु आता कॉंग्रेस खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांना आणखी एक विषय आला आहे. ज्यामुळे संसद आणि संसद परिसरामध्ये पुन्हा एकदा गडबड होण्याची शक्यता आहे.