पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते. घटना घडली त्यावेळी संबंधीत महिलेच्या घरात इतर कोणीच कुटुंबीय नव्हते. पीडित महिलेचे विवस्र अवस्थेतले फोटोही आरोपींनी काढलेत. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
नाशिकामध्ये अल्पवयीन गतीमंद मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
काय आहे प्रकरण?
पीडित महिला ही पाच महिन्याची गर्भवती असून पोलीस भरतीचे क्लासेस घेतात. मात्र, रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती. तर, पती कामावर गेले होते. त्यामुळे त्या एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान घराची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पती कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर ते कामावर गेल्याचे महिलेने सांगितले. मात्र, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, असे सांगत ते दोघे जबरदस्तीने घरात शिरले. त्यावर आज क्लासला सुट्टी आहे, तुम्ही उद्या या असं सांगितल्यानंतर पीडितेला धक्का देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचे फोटोही काढले. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग
महिला सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर -
काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट जळीतकांड घडल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. या घटनेत एकतर्फी प्रेमातून एकाने प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. यात पीडिता गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. महिला सुरक्षेसाठी कडक कायद्या करण्याची मागणीही करण्यात येतेय. दरम्यान, आध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही कायदा आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती दिली आहे.
VIDEO | विवस्त्र होऊन मोटरसायकल चालवणारी 'ती' तरुणी कोण? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा