तुळजापूर :  तुळजाभवानीचे (TuljaBhawani)  दागिने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court)  औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.  पुढील आदेशापर्यंत दागिने वितळवू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.  पुजारी मंडळाने औरंगाबाद खंडपीठात शासन निर्णयाविरोधात  धाव घेतील होती.


तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोने व 2 हजार 570 किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयाच्या दोन न्यायायाधीशांच्या खंडपीठने स्थगिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदीर संस्थानला सोने चांदी वितळवायला परवानगी दिली होती.  मात्र त्याला काही भाविक पुजारी यांचा विरोध होता.  त्यानंतर हिंदू जनजागरण समितीने कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल 13 वर्षानंतर राबवली जाणार होती.  सोने वितळवणे प्रक्रिया मात्र आता त्याला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. 


सोने चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती


भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. 1 जानेवारी 2009 ते 10 जून 2023 या दरम्यान जमा झालेल्या सोने चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली असून सुनावणी आता 9 जानेवारी 2024 ला होणार आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूची नोंद ही सोने सदृश्य असल्याने कोर्टाने नियमावली व प्रक्रिया सादर करीत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 


200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिने वितळवणार होते


गेल्या 10 वर्षांमध्ये तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी वाहण्यात आली. याच 200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिन्यांना आता वितळवलं जाणार आहे. हे सोनं - चांदी वितळवून त्याचे मोठे ब्लॉक केले जातील. वितळवण्यात आलेल्या सोन्यांचे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले जातील, ज्यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळणार आहे. शिवाय मंदिर संस्थानवर असलेली ही सोनं आणि चांदीच्या सुरक्षेची जबाबदारी कमी होईल. हे सोनं वितळवल्यानंतर 50 ते 60 टक्के प्युअर सोनं मिळेल असा अंदाज आहे.    सोनं चांदी वितळवण्याची पारदर्शक पद्धत अभ्यासण्यासाठी तुळजाभवानी मंदिराचे पदाधिकारी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहे.


हे  ही वाचा :


Beed Accident : शिर्डीहून तुळजापूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, दोनजण गंभीर जखमी