Thane: अनेक महिन्यांपासून रस्ते अपघाताची संख्या वाढत असल्याने या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेने धडक मोहीम सुरु केली आहे. त्यातून गुरुवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पाच हजार वाहन चालकांवर एकाच दिवशी कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 


रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने चालवल्याने अपघातांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. अनेकांचे प्राण गेलेले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने विशेष मोहिमेस प्रारंभ केला आहे. गुरुवारी दिवसभर नियम पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एकाच दिवसात पाच हजाराहून अधिक वाहनधारकांकडून 2 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. 


रिक्षा, टेक्सी, कॅबच्या ड्रेस न घातलेल्या 483 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या 541 वाहनांवर तर परवाना नसताना अथवा अवैध असताना देखील वाहन चालवणाऱ्या 200 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या 1 हजार 214 तर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या 94 मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 32, कोरोना नियम न पाळणाऱ्या 11, विना सीटबेल्ट असलेल्या 245, सिग्नल मोडणाऱ्या 99, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या 60, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 59, वाहन चालविताना फोन वर बोलणाऱ्या 44, वाहन परवाना अवैद्य असलेल्या 227 चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर प्रकारे नियमभंग करणाऱ्या 1 हजार 809 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे गुरुवारी दिवसभरात एकूण 5 हजार 118 नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.


वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे न जाण्यासाठी हेल्मेट घालणे, ड्रेस वापरणे, वाहतूक नियमांचे पालन करणे अशा गोष्टींचा अवलंब करावा जेणे करून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहन चालकांना केले आहे.


संबंधित बातम्या


प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार धावणार, दरही पूर्ववत होणार


Thane : 'लस' नाही तर 'बस' नाही; लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेचा निर्णय


Marathi School : मुंबईत गेल्या 10 वर्षात 130 मराठी शाळा बंद, 65 हजार मराठी विद्यार्थी पटसंख्या घटली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha