1. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत, इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली, ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत जाहीर होणार


मुंबईसह 14 महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होणार आहे. नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. मुंबईनवी मुंबईठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवलीसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत आज मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक, संभाव्य उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीत कोणत्या प्रभागांत? कोणतं आरक्षण असेल? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वच पक्षांतील नेते, संभाव्य-इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. 


2. दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आज संपणार, आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष


3. हनुमानाच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर आज नाशकात धर्मसंसद, हनुमानाचं जन्मस्थान किष्किंधा असल्याच्या गोविंदानंद यांच्या दाव्यावर खलबतं


4. म्याऊ म्याऊ प्रकरणानंतर आता नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर खालच्या शब्दात टीका, तर पंतप्रधानांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप दिपाली सय्यदांविरोधात आक्रमक


5. शिवसेना नेत्या दीपाली सय्यदांविरोधात भाजप आक्रमक, मोदींसंदर्भात अपशब्द वापरल्याबद्दल कारवाईची मागणी, यापुढे अपशब्द वापरल्यास बदडून काढू, भाजपचा इशारा


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 31 मे 2022 : मंगळवार



6. करकपातीनंतर कमिशन घटल्यानं महाराष्ट्रासह 19 राज्यात इंधन खरेदी बंद आंदोलनाची हाक, पेट्रोल पंप सुरुच राहणार, मात्र अफवेमुळं पंपांवर वाहनचालकांची गर्दी


7. रायगडच्या महाडमध्ये सहा मुलांना विहिरीत ढकलून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलं दगावली आई वाचली, दारूड्या नवऱ्याला कंटाळून टोकाचं पाऊल


8. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंची बदली, वानखेडेंची चेन्नईच्या डीजीटीएसपदी बदली


आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची आता बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या डीजीटीएस पदी बदली करण्यात आली आहे. हे पद अडगळीचं किंवा साईड पोस्टिंग असल्याचं समजलं जातंय.


9.  ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानं खळबळं, व्हिडीओ व्हायरल न केल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा, आज कोर्टाला पेन ड्राईव्ह सोपवणार


10. यूपीएससी 2021 परीक्षेत मुलींची बाजी, प्रियंवदा म्हाडदळकर देशात तेरावी तर महाराष्ट्रात पहिली; निखिल महाजन, अनिकेत हिरडे आणि आदित्य काकडे यांनाही घवघवीत यश