1. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून अजान सुरु असताना हनुमान चालिसा पठण, पहाटेच्यावेळी मशिदींसमोर आंदोलन, अनेक ठिकाणी मनसैनिकांची धरपकड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
2. मशिदींवरच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात राज ठाकरेंची मोहीम, पत्रक काढून देशभरातल्या हिंदूंना आवाहन, बाळासाहेब आणि पवारांच्या भूमिकेतल्या विरोधाभासाची आठवण
3. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात पोलिसांची सतर्कता, मुंबई पोलीस आयुक्त स्वतः ऑन फिल्ड, संवेदनशील भागातील मशीद आणि मंदिरांना पोलीस संरक्षण
4. औरंगाबाद सभेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंना कलम 149 अंतर्गत नोटीस, काही ठिकाणी मनसैनिक स्थानबद्ध, अनुचित प्रकार टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त
5. राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज सुनावणी, तर खारमधील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी पालिकेचं पथक धडकणार
6. ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणासाठी मंजूर केलेल्या कायद्याची आज परीक्षा, पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
7. यंदा पाऊस चांगला बरसणार आणि राजा कायम राहणार, बुलढाण्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत, ठोकताळ्यांवर विश्वास न ठेवण्याचं अंधश्रद्धा निर्मुलन समितीचं आवाहन
8. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांकडून 33 वर्षांनंतर म्हाडाला भूखंड परत, आश्वासनानुसार क्रिकेट अकादमी उभारु न शकल्याने निर्णय, गृहनिर्माणमंत्री आव्हाडांनी घेतलेला आक्षेप
9. राजस्थानच्या जोधपूर हिंसाचाराची सीसीटीव्ही दृश्यं समोर, समाजकंटकांकडून दगडफेक, तर अनंतनागमध्ये ईदच्या नमाजनंतर समाजकंटकांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला
10. आजपासून गुंतवणूदारांना एलआयसीचा आयपीओ खरेदी करता येणार, 902 ते 949 रुपये प्राईस बँड निश्चित, पॉलिसीधारकांना मिळणार सवलत