दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. शिर्डीतील शिबिरात हजेरी लावल्यानंतर पवार पुन्हा रुग्णालयात दाखल होणार, काल पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
शरद पवार आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजर राहून पुन्हा रुग्णालयात दाखल होणार अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला हजर राहण्याबाबत मात्र साशंकता
2. बारसू-सोलगावातील प्रस्तावित रिफायनरीला विरोध करण्यासाठी नाणारमधील संघटनाही मैदानात उतरणार, विरोधाची मशाल थंड करण्याचं उद्योगमंत्र्यांसमोर आव्हान
कोकणातील रिफायनरीचा विरोध आणखी तीव्र करण्याचा विरोधकांचा निर्धार केला आहे. नाणार रिफायनरी विरोधी संघटना बारसु - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
3. नोव्हेंबरपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ;खाद्यतेल, तूप, गहू यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचीही दरवाढ, तीन महिन्यांत महागाईचा आणखी भडका उडणार
दसरा-दिवाळीनंतर आता महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत. महानगर गॅसनं सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेतीन रुपयांनी वाढ केलीय. तर पीएनजीचे दरही दीड रुपयांनी वाढवण्यात आलेत. त्यामुळे मुंबईत सीएनजी आता 89 रुपये 50 पैसे किलो इतका झालाय. तर पीएनजी प्रति एससीएम 54 रुपये इतका झालाय. एकीकडे गॅस महागला असताना दुसरीकडे पुढच्या तीन महिन्यांत महागाई वाढणार असल्याचं भाकित एसबीआयच्या अहवालात करण्यात आलंय. पुढच्या तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध आणि तेल महागणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे धान्याचा तुटवडा होऊन महागाई वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
4. नाशिक महानगर पालिकेच्या जलशुद्धीकरण आणि मलनिस्सारण विभागानं घेतली बिबट्याची धास्ती, कामावर जाण्यास नकार, फटाके फोडून बिबट्याला पळवण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना
5. रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; प्लॅटफॉर्म दरवाढ मागे
6. प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीत मिनी लॉकडाऊन, पाचवीपर्यंत शाळा बंद, सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती, डिझेलवर चालणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी
7. बच्चू कडू-रवी राणांच्या वादात भाजप पडणार नाही, पण रस्त्यावर भाडणं करु नका; भाजप प्रदेशाध्यक्षांचा सल्ला
8. पिंपरी चिंचवडमधील परप्रांतीय प्रेयसी बेपत्ता, पत्रकार प्रियकर चौकशीसाठी ताब्यात
9 . ट्विटरचा भारतातील कर्मचाऱ्यांना दे धक्का, 200 पेक्षा अधिक जणांना नारळ, अमेरिकेत कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची एलन मस्कविरोधात कोर्टात धाव
10. मराठी रंगभूमी दिनानिमित्त प्रशांत दामलेंशी दिलखुलास गप्पा, साडेबारा हजार नाट्यप्रयोगांचा प्रवास उलगडणार, तर सतीश आळेकरांना विष्णूदार गौरवपदक जाहीर