1.धनुष्यबाणासाठीच्या राजकीय लढाईतला महत्वाचा दिवस, कागदपत्रांसाठी निवडणूक आयोगानं दिलेली मुदत संपुष्टात, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी निर्णय अपेक्षित
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आज आपलं प्राथमिक उत्तर आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झालीय. अधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलंय.
2. सत्तांतरानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण, महाविकास आघाडीनं घेतलेल्या अनेक निर्णयात फेरबदल करत नव्या सरकारचा धक्का
3. 'जो मनाचा मोठेपणा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता तो पंतप्रधान मोदींमध्ये नाही'; भर पावसातल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
4. 2023 मध्ये जागतिक मंदीची शक्यता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भाकीत, भारतासह प्रमुख अर्थव्यवस्थांसमोर मोठं आव्हान
5. राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार, गावं जलस्वयंपूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming) आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. पुण्यात 'नैसर्गिक शेती' राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं
6. मोबाईलमध्ये 5 जी प्रणाली अपडेट करून देण्याचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रिय, सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचं आवाहन
7. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात, साताऱ्यातल्या कोयना पट्ट्यातील हेळवाक गावातली घटना, पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद
8. प्रियकरासाठी मोठ्या बहिणीकडून लहान बहिणीची हत्या गुन्हा लपवण्यासाठी रचला आत्महत्येचा बनाव, अहमदनगरच्या कोपरगावातली घटना
9. मुंबई उच्च न्यायालयाला लाभणार सहा नवे न्यायमूर्ती; हायकोर्टातील न्यायमूर्तींची संख्या 67 होणार
10. आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन, परतीच्या पावसानं शेतकरी चिंतेत
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून, पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. अशातच राज्यातील काही ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे.