दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. सीएनजीचे दर प्रतिकिलो 6 रुपयांनी तर घरगुती वापरासाठीचा पीएनजी 4 रुपयांनी महागला, ऐन सणासुदीत जनतेच्या खिशाला भार
ऐन सणासुदीच्या काळात सीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झालीय. सीएनजीचे दर 6 रुपयांनी तर घरगुती गॅसचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत.
2. ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं काऊंटडाऊन सुरु, तयारी अंतिम टप्प्यात, दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ
3. अनिल देशमुखांच्या जामिनाचा आज फैसला,उच्च न्यायालयानं राखून ठेवलेला निर्णय आज सुनावणार, 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली देशमुख तुरुंगात
4. आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती असणार
5. साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी जय्यत तयारी, दसऱ्यानिमित्त लाखो भाविक शिर्डीच्या दिशेने
6. राज्यात पावसाचा जोर ओसरला, आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट
7. काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीचे समन्स, नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज होणार चौकशी
8. धक्कादायक! जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालकांची हत्या, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
9. अफगाणिस्तानात मृत्यू तांडव सुरूच, काबुलमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट, 46 मुलींसह 53 जणांचा मृत्यू
10. दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-20 सामन्यात पराभूत करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, पाहुण्यांना व्हाईट व्हॉश देण्याची संधी