दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. गुजरातमधल्या मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 140 वर, 100हून अधिक जखमी,बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडो घटनास्थळी
2. दुरुस्तीनंतर 25 ऑक्टोबरला सुरु झालेला पूल कोसळल्याने चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, 100 जणांची क्षमता असताना दुर्घटनेवेळी 400 जण उपस्थित असल्याची माहिती
3. बच्चू कडू आणि रवी राणा वादावर रात्री 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा, अडीच तास खलबतं, आज दोन्ही नेते फडणवीसांना भेटणार
4. टाटा एअरबसनंतर सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेल्याचा विरोधकांचा आरोप, तर सत्तानाट्याचा काळात प्रकल्प हैदराबादेत, भाजपचं स्पष्टीकरण
5. अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागितला तर तुमचे दारुपार्टीचे व्हिडीओ बाहेर काढू, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 31 ऑक्टोबर 2022 : सोमवार
6. शिंदे सरकारनं जाहीर केलेली प्रकल्पांची यादी मविआच्या काळातली, सुप्रिया सुळेंनी खोडून काढला सरकारचा दावा तर उद्योग, अतिवृष्टीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी
7. किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकरांवर हल्लाबोल, मृत भावाच्या नावाने एसआरए घोटाळा केल्याचा आरोप तर खोटे आरोप करुन बदनामीचं षडयंत्र, पेडणेकरांचा पलटवार, आज पुन्हा चौकशी
8. शहापूरमधल्या माहुलीगडावर वाट चुकल्याने 11 पैकी 4 पर्यटक अडकले, वनविभाग आणि स्थानिकांकडून शोध सुरू
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली गडावर (Mahuli Fort) रविवारी वाट चुकलेल्या सहा पर्यटकांचा शोध घेण्यात ग्रामस्थांना यश आले. ठाणे आणि ऐरोली येथील पर्यटक वाट चुकल्याने सायंकाळी माहुली गडावरच भरकटले होते. गडावरून खाली येण्याची वाट न सापडल्याने हे दोघे तेथेच अडकून पडले होते. अखेस सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील माउंट एवरेस्ट समजला जाणाऱ्या किल्ले माहुली गडावर ट्रेकिंगसाठी ठाणे आणि ऐरोली येथून 11 पर्यटकांपैकी चार पर्यटक गडावर दिशादर्शक सूचनाफलक नसल्यामुळे वाट चुकल्याने सायंकाळी माहुली गडावरच भरकटले होते. वाट चुकल्यानंतर त्यांनी आडवाटेने गड उतरण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. सदर घटनेची माहिती किल्ले माहुली गड प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पितांबरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जीवरक्षक रेस्क्यू टीम तसेच वनविभाग व स्थानिक पोलीस गडावर दाखल झाली. तब्बल सहा तास गडावर अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी घेऊन येण्यात यश आले.
9. अकोल्यात ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपलेंची हत्या, प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर अद्याप मोकाट
10. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन, इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी, सोनिया गांधी आणि खरगे शक्तीस्थळावर श्रद्धांजली वाहणार