दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू, दीडशेहून अधिक जखमी, 50हून अधिकजण हार्टअटॅकने दगावल्याची माहिती


दक्षिण कोरियाच्या सेयूलमध्ये काल रात्री चेंगराचेंगरी झाली. हॅलोविन पार्टीदरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीत, 151 जणांचा मृत्यू, तर 150 हून अधिक जखमी झालेत. दरम्यान हा आकडा वाढण्याची शक्याता आहे.


2. रवी राणा-बच्चू कडू वादावर आज तोडगा निघण्याची शक्यता, दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी वर्षावर भेटीसाठी बोलावलं, मुंबईला रवाना होण्याआधी राणांनी अधिक बोलणं टाळलं


बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात समेट घडवण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल दुपारी मुख्यमंत्र्यांनी फोनवर संवाद साधून रवी राणा आणि बच्चू कडूंना आज मुंबईला बोलावले आहे. 


3. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एअरबस प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात, तर उद्योगमंत्री उदय सामंताकडून कागदपत्र सादर करत आदित्य ठाकरेंना उत्तर


4. राज्यात मोठेमोठे उद्योग येणार, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया तर मविआ नेत्यांची नार्को चाचणी करा, राम कदमांची मागणी


5. महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पाची आज गुजरातमध्ये पायाभरणी, बडोद्यात देशातील पहिल्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 30 ऑक्टोबर 2022 : रविवार



6. कैलास पाटील यांचा उपोषणाचा सातवा दिवस, शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेणार, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कैलास पाटील ठाम 


7. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, कोरोनाकाळातील वय झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता, पुढील आठवड्यात सुधारित तारखा जाहीर होणार


8. किशोरी पेडणेकरांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याचा सोमय्यांचा इशारा, एसआरए घोटाळ्याची कागदपत्रं प्रसिद्ध करण्यासाठी सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार


9. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राची साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार, याप्रकरणी माझी मदत करा, शर्लिनचं सलमान खानलाही आवाहन 


10. टी-20 विश्वचषकात भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी, पाकिस्तान टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार, मोठ्या फरकाने भारत जिंकल्यास पाकची उपांत्य फेरीची आशा कायम