1. आशिया चषकात भारताची विजयी सलामी, पाकिस्तानला ५ विकेट्सनी धूळ चारत टी-२० विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा, अष्टपैलू पंड्या ठरला विजयाचा शिल्पकार


2. आशिया चषकातील भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष, पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं अभिनंदन, तर शरद पवारांकडूनही विजयाचं सेलिब्रेशन


3. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश


गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi 2022) जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती  महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी दिले आहेत. खालापूर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.


4. सत्तासंघर्षाचा निकाल किमान ५ वर्ष लागण्याची शक्यता नाही,  त्यामुळे आम्हीच पुन्हा आमदार होणार, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या विधानानं खळबळ


पाहा व्हिडिओ: स्मार्ट बुलेटिन: 29 ऑगस्ट 2022 



5. कोल्हापुरात आज गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा, सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने येणार, सभा वादळी ठरण्याची शक्यता


6.  काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार, अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान आणि  19 ऑक्टोबरला मतमोजणी होण्याची शक्यता


7. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आमदारकीबाबत आज राज्यपाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता, राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता


8. रिलायन्सची आज सर्वसाधारण सभा..मुकेश अंबानीकडून 5G इंटरनेट सेवा, ग्रीन एनर्जीबाबत मोठ्या घोषणांची शक्यता


रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) आज पार पडणार आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या बैठकीत मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ (Reliance 5G Internet), 5 जी इंटरनेट दरासह (Reliance Jio 5G Internet Price) जिओच्या आयपीओची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय, मुकेश अंबानी कंपनीच्या संचालक मंडळावर आपल्या मुलांना सहभागी करून घेतील अशी शक्यता आहे. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसह मुंबई शेअर बाजाराचेही लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 


9. NASA चे सर्वात शक्तिशाली रॉकेट 'आर्टेमिस 1'  प्रक्षेपणासाठी सज्ज, मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी नासाची महत्त्वाची मोहीम


10. पाकिस्तानवर अस्मानी संकट; 110 जिल्ह्यांत पूर, एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू...