Dadasaheb Satre : कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा (comrades marathon) ही बारामतीतील (baramati) दादासाहेब सत्रे(dadasaheb satre) याने पूर्ण केली आहे. जगातील सर्वात जुनी मॅरेथॉन स्पर्धा अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा बारामतीचा युवा धावपटू दादासाहेब सत्रे याने आठ तास पन्नास मिनिटात पूर्ण करत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटरमार्टित्झबर्ग या दोन शहरांदरम्यान झालेल्या या स्पर्धेत  दादासाहेब यांनी या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारे दादासाहेब सत्रे हे पहिलेच बारामतीकर ठरले आहे.  


सन 1921 मध्ये सुरु झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास आहे. जगभरारातील स्पर्धेक या  स्पर्धेत सहभागी होत असतात. मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस ही स्पर्धा पूर्ण करताना लागतो. या स्पर्धेत जवळपास 1500 मीटरहून अधिक उंचीच्या पाच मोठ्या व सात छोट्या डोंगररांगामधून जाणारी ही स्पर्धा 90 कि.मी. अंतराची असते. हे 90 किलोमीटरचे अंतर बारा तासात ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान धावपटूंपुढे असते. ही स्पर्धा दादासाहेब सत्रे यांनी 8 तास 50 मिनिटांत पूर्ण केली आहे. सत्रे यांनी सरासरी 5 मिनिटं 54 सेकंदात एक किलोमीटर अंतर कापून पार केलं आहे.  जगभरातून या स्पर्धेसाठी सोळा हजार धावपटूंनी नोंदणी केली होती. 


ही स्पर्धा पूर्ण करताना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेत सकाळी पाच अंश सेल्सियस तापमान असते तर दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका बसतो, अशा परस्परविरोधी वातावरणात ही स्पर्धा झाली. शारिरीक व मानसिक क्षमतेचा पूर्ण कस यात लागला . या स्पर्धेत सहभागी होणारा बारामती तालुक्यातील दादासाहेब सत्रे हा पहिलाच धावपटू ठरला आहे. त्याने या स्पर्धेसाठी कमालीची मेहनत केली असून विक्रमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत नवीन इतिहास घडविला.  


बारामतीच्या नऊ युवकांनी नुकतीच कझाकिस्तान येथे झालेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली होती, त्या पाठोपाठ आता दादासाहेब सत्रे यांनी ही मॅरेथॉन विक्रमी वेळेत पूर्ण करत बारामतीचे नाव जागतिक स्तरापर्यंत नेऊन पोहोचविले. त्यामुळे सत्रे यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.