1. शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची आज बैठक, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही बैठकीला उपस्थित राहणार, 


2.  कोकणात जाणाऱ्यां गणेशभक्तांनाना सरकारकडून टोलमाफीचं गिफ्ट, 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत  टोलमुक्त प्रवास, तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचीही लगबग


3. किरीट सोमय्या यांची अनिल परब यांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवर पायी यात्रा, बेकायदा रिसॉर्ट तोडण्याच्या आदेशानंतर सोमय्या आज खेडपासून दापोलीपर्यंत पायी जाणार


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) आता शिवसेनेतील विद्यमान नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज दापोलीत जात आहेत. सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही काढणार आहेत. 


राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. त्याशिवाय, या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 


4. आगामी निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार, संघ विचारांचा विरोध केल्यानं  शिवसेनेसोबत, संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य तर ठाकरेंचा भाजपला टोला


5. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेला दिलासा, कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेला 4 आठवड्यांची वाढीव मुदत


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 27 ऑगस्ट 2022 : शनिवार



6. मुंबईत मढमधील कथित स्टुडिओ घोटाळ्यावरुन किरीट सोमय्या आक्रमक, सोमय्यांचा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर निशाणा, 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप


7. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा पक्षाला रामराम, सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा, सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी पत्रात राहुल गांधींवर हल्लाबोल


8. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात धरण फुटलं, मोठं नुकसान झाल्याचा अंदाज, पुरामुळे 1 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याने देशात आणीबाणी लागू


9. सोनाली फोगाट यांची ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू, गोवा पोलिसांची माहिती, पार्टीतलं सीसीटीव्ही समोर, ड्रग्ज जबरदस्तीनं दिल्याचा संशय


10. आजपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, सलामीची लढत श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये, क्रिकेटप्रेमींच्या नजरा उद्याच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे