दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात निर्बंधमुक्त नवरात्रोत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तीपीठांसह प्रसिद्ध देवींचं दर्शन एबीपी माझावर


आजपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात होत असून घटस्थापनेनंतर (Ghatsthapana) दुर्गेचे पहिले रूप देवी शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार, पार्वती ही हिमालय पर्वतराजाची कन्या आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. शैल म्हणजे हिमालय आणि हिमालयाच्या पर्वतराजात तिचा जन्म झाल्यामुळे तिचे नाव शैलपुत्री पडले. पार्वतीच्या रूपात, तिला भगवान शिवाची पत्नी म्हणून देखील ओळखले जाते. जाणून घ्या देवी शैलपुत्रीची पूजा, मंत्र आणि सर्वकाही


असे आहे देवी शैलपुत्रीचे रुप
देवी शैलपुत्रीचा स्वभाव अतिशय शांत आणि साधा आहे. आईच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. आई तिच्या नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर बसलेली असते, म्हणून देवी शैलपुत्रीला वृषोरदा आणि उमा असेही म्हणतात. हे वृषभ वाहन शिवाचे रूप आहे आणि शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक आहे. देवी शैलपुत्रीने कठोर तपश्चर्या करूनच भगवान शंकराला प्रसन्न केले होते. जे भक्त योग, ध्यान आणि अनुष्ठानासाठी हिमालयात आश्रय घेतात. देवी नेहमी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते.


2.  गरब्यासाठी आधार कार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी, मराठी आणि गुजराती गरब्याचं आयोजन म्हणजे ध्रुवीकरणाचा प्रयत्न, सेनेची भाजपवर टीका


3. मराठा आरक्षणासंदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य, वादाला तोंड फुटण्याची चिन्ह


4. शिवसेनेच्या दोन्ही गटात दसरा मेळाव्यासाठी, तर धनुष्यबाण चिन्ह कोणाचं यासाठी भांडण सुरू, काहीच दिवसांत शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील, गिरीश महाजन यांचं वक्तव्य 


5. किल्ले रायगडवर पिंडदान करण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल, चुकीचं काम होत असेल तर कारवाई केली जाईल, गृहमंत्र्यांची माहिती, तर संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 26 सप्टेंबर 2022 : सोमवार


6. पुण्यातील आंदोलनातील पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या व्हिडीओची फॉरेन्सिक तपासणी होणार, घोषणा दिल्याच नसल्याचा काहींचा दावा


7. फॉक्सकॉन मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आज भाजपचं आंदोलन, तळेगावात नितेश राणे, राम शिंदे आणि पडळकर उपस्थित राहणार


8. मुंबईच्या विलेपार्लेत आठ ते दहा घरं कोसळली, मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसल्याचा स्थानिकांचा आरोप, पुन्हा त्याच ठिकाणी घरं बांधून देण्याची मागणी


9. गेहलोत समर्थक 82 आमदारांच्या राजीनाम्यामुळे दिल्ली हायकमांड संकटात, सचिन पायलट यांचं मुख्यमंत्रिपद हुकावं म्हणून पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक


10. हैदराबाद टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत भारतानं मालिका जिंकली, आता टी-20 वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिफेशी दोन हात