दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंसह 7 बंडखोर मंत्र्यांवर कारवाई होणार, एबीपी माझावर संजय राऊतांचा इशारा
 
2. विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता वरळीतून जातो, शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा, आज होणाऱ्या युवासेनेच्या बैठकीत अनेक ठराव होण्याची शक्यता
 
3. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून तोडफोड,  ठाण्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदेंचंही कार्यालय फोडलं, एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळं फासलं


4. महाविकास आघाडीच्या विळख्यातून शिवसेनेला सोडवण्यासाठी लढतोय, ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंची शिवसैनिकांना साद तर गुवाहाटीत शिंदे गटाचा मुक्काम 30 जूनपर्यंत वाढला
 
5. महाराष्ट्रात अस्वलाच्या गुदगुल्या, शिंदे मुख्यमंत्री का झाले नाहीत? सामनातून हल्लाबोल; संजय राऊतांच्या ट्वीटचीही चर्चा


6. सरकार अस्थिर करण्यासाठी पैसा कुणी पुरवला? ईडी, इन्कम टॅक्स विभागानं चौकशी करावी; राष्ट्रवादीची मागणी


7. सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने घेतलं ताब्यात, गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीनचिट मिळाल्यानंतर कारवाई, भाजपचा काँग्रेसवर निशाणा


8.राज्यात राजकीय तणावाचा पोलिसांवर ताण; आठ तासाची ड्युटी 12 तासांवर, सुट्ट्याही रद्द
 
9. जर्मनीत पंतप्रधान मोदी जी-7च्या बैठकीत होणार सहभागी, ऊर्जा, अन्नसुरक्षेसह विविध मुद्यांवर होणार चर्चा तर मन की बातमधून आज देशवासियांशी संवाद


10. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ


Rohit Sharma Corona Positive : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. शनिवारी त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत म्हटलं आहे की, 'भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी रोहितची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.'