दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. दिवाळीमुळे बाजारात चैत्यनाची लहर, दुकानांत ग्राहकांची गर्दी, दिवाळीचा मुहूर्त साधत सोनं, वाहन आणि घर खरेदी


2. देवदर्शनानं अनेकांच्या दिवाळीची सुरुवात, राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी 


3. अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या बळीराजाची दिवाळीही गोड करुयात, एबीपी माझाचं प्रेक्षकांना आवाहन, शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत


प्रकाशाचं पर्व, तेजाचा उत्सव आणि मांगल्याचे पूजन अर्थात दीपावली.... सणांचा राजा असलेला दिवाळी सण प्रत्येकाच्या मनात चैतन्य, उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो... दिव्यांची आरास आणि कंदिलाच्या प्रकाशाने अंगण उजळून निघालंय.. फराळाच्या ताटाचा दरवळ सुटलाय... त्यातच कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होतेय.. त्यामुळे यंदा दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतोय... कपडे, फटाके, मिठाई खरेदीसाठी झुंबड उडालीय.. दिवाळीचा मुहूर्त साधत सोने, वाहन आणि घर खरेदी करण्यात येते...  एकीकडे हा उत्साह असला तरी महाराष्ट्राच्या काही भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे दिवाळीत या शेतकऱ्यांचीही आठवण ठेवूया.... या शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करत आपण सारे माणुसकीची दिवाळी साजरी करुया हेच आवाहन एबीपी माझा करतंय... 


4. घोषणांची अतिवृष्टी आणि भावनांचा अतिदुष्काळ, औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचा शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल, हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाईची मागणी


5. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमालाही शिंदे- ठाकरे गटातील राजकारणाचा रंग, दोन्ही गटामध्ये जोरदार रस्सीखेच


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 24 ऑक्टोबर 2022 : सोमवार


6. ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 8 लाखांहून अधिक शपथपत्र दाखल, सत्तांतरानंतरच्या अस्तित्वाच्या लढाईतलं मोठं पाऊल


7.  घरोघरी मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाकडून मशाल साँग रिलीज, मशाल गीत शिवसैनिकांना लढण्याची ताकद देणार 


8. वर्धा बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांचे हाल


9. 2014 पासूनची परंपरा मोदी यंदाही कायम ठेवणार, कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार 


10. पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावून आणणाऱ्या कोहलीवर विराट शुभेच्छांचा वर्षाव, बॉलिवूडही फिदा, तर पत्नी अनुष्काची भावूक पोस्ट