Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. एसबीआय आणि आयओबी वगळता 26 ते 29 मार्च पर्यंत राष्ट्रीयकृत बँका बंद, शनिवार रविवार जोडून बँक कर्मचारी संघटनांनी साधला संपाचा मुहूर्त
2. स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळं आणि प्राधिकरणांचा कारभार मराठीतून करणं सक्तीचं, कायद्यातून पळवाट काढता येऊ नये म्हणून सुधारणा विधेयक आणणार
3. श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी देशातून फरार, सूत्रांची माहिती, चतुर्वेदींना ईडीचं समन्स
4. दिल्लीतले पुतीन रोज महाराष्ट्रावर मिसाईल सोडतात, राऊतांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र, तर देवेंद्र फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर
5. महाराष्ट्रासह देशातल्या 7 राज्यात डेल्टाक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं वृत्त निराधार, देशात डेल्टाक्रॉनचा एकही रुग्ण नाही, डॉ. भारती पवारांची 'माझा'ला माहिती
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 24 मार्च 2022 : गुरुवार
6. वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली, कराडकरांकडून महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख
भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं भारताला स्वराज्य मिळवायला एक वर्ष लागलं असतं, असं लोकमान्य टिळकांचं एक वाक्य असल्याचं ही बंडा तात्या म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.
बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले...
बंडा तात्या कराडकर म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही, असं कराडकर म्हणाले.
7. पिंपरी-चिंचवडमध्ये 60 हजार ग्राहकांची बत्तीगुल, महावितणरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मांजर शिरल्यानं वीज गायब, 7 हजार 500 कंपन्यांना आठवडाभर बारा तासच वीज पुरवठा
8. दोन वर्षानंतर देश कोरोना निर्बंधातून मुक्त होणार, 31 मार्चपासून निर्बंधातून सुटका, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य, मुंबईकरांची मास्क सक्तीतून सुटका होण्याची शक्यता
9. लग्न केल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा परवाना मिळत नाही, वैवाहिक बलात्काराला, बलात्काराच्या श्रेणीतून वगळण्याची चर्चा सुरु असताना कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय
10. काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न, कुणी ढवळाढवळ करु नये, पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या चीनला भारतानं खडसावलं