1. भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची रौप्य भरारी; जागतिक जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्यपदक


भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं. नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.


2. विचार सोडून सत्तेच्या मागे लागाल तर पक्षाचा ऱ्हास होतोच, फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर मंत्रिमंडळ विस्तारात त्यागाची तयारी ठेवा, फडणवीसांचा भाजपमधील इच्छुकांना सल्ला


3.मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, पनवेलमधील भाजप कार्यकारिणीत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, त्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढला, फडणवीसांचं स्पष्टीकरण


4. आजचं राजकारण हे 100 टक्के सत्ताकारण, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची खंत, कधी-कधी राजकारण सोडावसं वाटतं, नागपुरातल्या कार्यक्रमात गडकरींचं वक्तव्य


5. ठाकरे आणि शिंदे गटातला वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात, कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची मुदत


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 24 जुलै 2022 : रविवार



6. मंत्रिमंडळ विस्तारात त्यागाची तयारी ठेवा, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा इच्छुकांना सबुरीचा सल्ला


7. पुढील दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करणार, मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांचं आश्वासन, मुंबईभर काँक्रीटचे रस्ते बांधण्याचे आदेश


8. राज्यात पुढील तीन दिवसांत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात विजांच्या कडकडाटासाह पावसाचा अंदाज


9. नायगाव बीडीडी चाळीतील पोलिसांना घरं खाली करण्याची नोटीस, एबीपी माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कारवाई थांबवण्याचे निर्देश


10. मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित, 75हून अधिक देशात मंकीपॉक्सचे रुग्ण, भारतातही तीन रुग्ण