दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेण्यात येतो.



1. लोकशाही की बेबंदशाही हे लवकरच स्पष्ट होईल, मविआच्या बैठकीनंतर ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल, मविआ महापालिका निवडणुका एकत्र लढणार की नाही हे अद्याप अस्पष्ट


2. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवरुन पवारांचा मोदींवर निशाणा, विरोधकांना एकत्र राहण्याचं आवाहन, देशमुख, मलिक आणि राऊतांच्या अटकेवरुनही टीकास्त्र


3. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, पुण्यातील अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या चौकशीनंतर कटाचा पर्दाफाश


4. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे दोनच दिवस उरले; आज पाचव्या दिवशी संघर्ष तीव्र होणार


Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी कामकाज उरकून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर काल चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडलं. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे.  हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


5. समर्थ रामदासांचे देव चोरणारे दोन दिवसांनंतरही मोकाटच, जांब समर्थ गावात आजपासून अन्नत्याग आंदोलन


6. निसर्गाच्या लहरीपणाचा संत्र्याच्या पिकाला मोठा फटका, 70 ते 80 टक्के पीक हातातून जाण्याची भीती, आज स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार


7. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रशिया मोठ्या हल्ल्याच्या तयारीत,  अमेरिकेकडून युक्रेनमधील दुतावासाला हाय अलर्ट


8.बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकारची आज 'महा-परीक्षा'! बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान


9.जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी अटकेत, नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा कट उधळला


10. अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, स्वतः बिग बींनी ट्विट करत दिली माहिती