दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची लढाई, पालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आज हायकोर्टात सुनावणी, शिंदे गटाचीही मध्यस्थी याचिका
दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) राजकारण (Maharashtra Politics) चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा की, शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.
2. दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना निमंत्रणाची तयारी, मुख्यमंत्र्यांच्या लांबलेल्या दिल्ली दौऱ्यानं चर्चांना उधाण
3. मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी शिंदे सरकार आग्रही, भाजप मात्र विरोधी भूमिकेत, निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम
4. अहमदनगर-आष्टी मार्गावर आज पहिली प्रवासी रेल्वे धावणार, रेल्वे राज्यमंत्री दानवे-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, बीडवासियांचं स्वप्न साकार होणार
5. मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला, 17 तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प, अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 23 सप्टेंबर 2022 : शुक्रवार
6. सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानं खातेधारकाचं धाबं दणाणलं, ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार
7. हायकोर्टाकडून रुपी बँक धारकांना मोठा दिलासा, रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती
8. धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद, ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
9. देशभरात 15 राज्यांमध्ये एनआयए आणि एटीएसचे छापे, महाराष्ट्रात पीएफआयशी संबंधित 20 ठिकाणी धाडी, 20 जणांना अटक
10. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज नागपुरात दुसरा टी-20 सामना, जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम, मालिकेत पुनरागमन करण्याचे रोहित सेनेचं लक्ष्य