दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. टी-20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान महामुकाबला, पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहितसेना सज्ज, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 ची उत्सुकता


मेर्लबनमध्ये टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मागचा टी-20 विश्वचषक आणि आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहितसेना सज्ज झाली आहे. 


2. सांताक्रुझनंतर मजास डेपोतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर, बोनस, पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक


3.  उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर,  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, शिवसेना फुटल्यानंतरचा पहिलाच महाराष्ट्र दौरा


4.  येत्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य तर ठाकरेंचे चार आमदार संपर्कात, राणेंचा दावा


5.   मनसेनं भविष्यात शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही! आमदार राजू पाटलांचं मोठं वक्तव्य


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यातील जवळीकता गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन केलं आहे. मनसेनं भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असं मोठं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असं राजू पाटील म्हणाले आहेत.


6.  पुणे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू, तर मृत प्रवासी आधीच आजारी असल्याचा रेल्वेचा दावा


पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नक्की ही घटना कशामुळे घडली  याचा पोलिस तपास करत आहेत.  


7.  पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, रामलल्लाचं दर्शन घेऊन भव्य दीपोत्सवात होणार सहभागी, 15 लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार रामनगरी


8. नागपुरात 'मेट्रोमोनियल' साईटवरुन लावला पाच लाखांचा चुना; लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार


9. इस्रोनं पुन्हा घडवला इतिहास, बाहुबली रॉकेट अंतराळात झेपावलं, LVM3 M2 मधून ३६ सॅटेलाइट उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण


10. चीनच्या राष्ट्रपतीपदी शी जिनपिंग यांच्या नावावर तिसऱ्यांदा होणार शिक्कामोर्तब, पदावर विराजमान होण्याआधी जिनपिंग यांची हिटलरशाही, माजी राष्ट्रपतींना बैठकीत हाकललं