1.  पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, अकोल्यातील वादळाचा व्हीडिओ व्हायरल, मान्सूनचं अरबी समुद्रात आगमन


2. सांगलीला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, अकोल्यातील अकोटमधील चक्रीवादळाचा व्हीडिओ व्हायरल, कोकण-मराठवाड्यातही मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी


3. पुण्यामध्ये शरद पवार महत्त्वाच्या ब्राह्मण संघटनांशी चर्चा करणार, ब्राह्मण महासंघ आणि परशुराम महासंघाचा चर्चेला विरोध


4. महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्याचं कडवं आव्हान, जयंतकुमार बांठियांच्या नेतृत्वाखाली आयोग राज्यभर दौरा करणार


5. राज्यसभेसाठी शिवसेनेच्या दोनपैकी एका जागेवरील उमेदवार निश्चित, 26 मे रोजी संजय राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार, पाठिंब्यासाठी संभाजीराजे छत्रपतींकडून प्रयत्न सुरु


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 21 मे 2022 : शनिवार



6. मध्य रेल्वेवर आज रात्री 11.30 वाजेपासून पहाटे 4.30 वाजेपर्यंत, तर रविवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत पर्यंत डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक


7. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून मुंबईत नवा उपक्रम, 1 जूनपासून मुंबईकरांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'शिवयोगा' सेंटर सुरु करण्याचा निर्णय


8. पुण्यातील लाल महालातील लावणीच्या शुटींगवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, कलाकार आणि महापालिकेच्या सुरक्षारक्षकांविरुद्ध कारवाईची मागणी, राष्ट्रवादीही आज आंदोलन करणार 


उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल आणि सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठं लावायचं? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मित्रपक्ष काँग्रेसला सवाल केला आहे. 


सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, "राहुल गांधींनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. 2024 ची तयारी मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झालीय. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरं नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?" 


9. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे?, सामनाच्या अग्रलेखातून मित्रपक्षासाठी सवाल, तर राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून भारत जोडो अभियान


10. हैदराबाद बलात्कारप्रकरणातील एन्काऊंटरप्रकरणी 10 पोलिसांवर खटला चालवण्याची शिफारस, आरोपींना ठार मारण्याच्या हेतूनेच गोळीबार केल्याचं चौकशी अहवालाचं मत