Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



आज राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी  होणार, मनसैनिक शिवाजी पार्कवर एकवटणार तर अमित ठाकरे किल्ले शिवनेरीवर दाखल


आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम


Maharashtra Budget Session 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. गिरीश महाजन यांनी याबाबत हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेतं तेही पाहावं लागणार आहे.  तसंच काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या सभागृहात या अखेरच्या आठवड्यात तरी बोलणार का हा प्रश्न आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेलेल दोन आठवडे सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


शिवसेना मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री सभागृहात कधी बोलणार? 
 
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात बोलले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि पदाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यामुळं अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात ते सभागृहात बोलतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. 


अधिवेशनाच्या शेवटच्या 5 दिवसांत तरी विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का?


आज पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या तिढ्याबाबत चर्चा होणार आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच सरकारनं आता नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा याविषयावर राज्यपालांची भेट घेतात का याकडे लक्ष लागून आहे. भाजपच्या गिरीश महाजनांची याबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका अर्ज दाखल झालाय. यावर काय निर्णय होतो याकडेही लक्ष लागलेले आहे.


ठाकरे सरकार नाही तर पवार सरकार, निधी वाटपावरुन शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवरही नाराजी


पोलीस भरतीत एनसीसीचं प्रमाणपत्रअसलेल्यांना वाढीव गुण, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती, 2 ते 5 टक्के गुण मिळणार 


गोव्यात दुपारी 4 वाजता भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक, मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा तर उत्तराखंडबाबत सस्पेन्स कायम


जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट्समुळे धास्ती असताना  महाराष्ट्रात सकारात्मक चित्र, 23 जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन, भाजप किसान मोर्चा आक्रमक


भारताचं परराष्ट्र धोरणं लोकहिताचं, सरकारवरील संकटानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारतावर स्तुतीसुमनं


पुतीन यांच्यासोबतची चर्चा अपयशी ठरल्यास तिसरं महायुद्ध निश्चित होणार, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली भीती


बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला, रौप्य पदकावर समाधान, फायनलमध्ये व्हिक्टर ऍक्सेलसनकडून पराभूत