Sharad pawar on MIM: एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावरून सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव नाकारला असला, तरी भाजपनं मात्र महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार बारामीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधित निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत तो पक्ष निर्णय नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय.
काश्मिर फाईल्सवर शरद पवारांची प्रतिक्रिया
देश एका विचाराने चाललेला आहे.. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत.. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजे. ज्या चित्रपटाबद्दल आता सांगितलं जातंय. त्यामध्ये कळत नकळत कॉंग्रेसवर एक दोष देण्याचा प्रयत्न केला जातोय.. कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं आणि तेच याला जबाबदार आहेत असं ध्वनित केलं जातंय. या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. जो कालखंड आहे ज्यामध्ये कश्मीरमध्ये जे काही घडलं जे आता दाखवलं जातंय. त्या कालखंडामध्ये देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं. त्यावेळी विश्वप्रताप सिंह यांच्याकडे होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते तेही भाजपच्या पाठबळावरच होते. आणि राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. जे राज्यपाल होते ते कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळं आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संबध कालखंडामध्ये या सर्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Girish Mahajan: गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात; सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
- Shivjayanti 2022 : मनसे तिथीनुसार जल्लोषात साजरी करणार शिवजयंती, राज ठाकरेंच्या उपस्थितीत हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्ठी
- Latest Latur News : तृतीयपंथीयांचा मदतीचा हात, बिकट परिस्थितीत असणाऱ्या कुटुंबातील मुलीचं थाटामाटात लावले लग्न