दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचा गट नॉटरिचेबल, शिंदे गुजरातमध्ये असल्याची सूत्रांची माहिती, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला कोण हजर राहणार याकडे लक्ष
2. विधान परिषदेत काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा जास्त मत घेत भाजपचे पाचही उमेदवार विजयी, दहाव्या जागेसाठी जगताप-लाड यांच्यात चुरस असताना चंद्रकांत हंडोरेंचा बळी
3. शिवसेनेच्या गोटातील 12 मतं फुटली, राष्ट्रवादीनं 6 जादा मतं मिळवल्यानं महाविकास आघाडीत चर्चांना उधाण, हंडोरेंच्या पराभवामुळं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
4. महाविकास आघाडीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल, विधान परिषदेच्या निकालानंतर नसीम खान यांचं सूचक वक्तव्य, आमदारांचा एक गट हायकमांडला भेटणार
5. मोहटा देवीच्या दर्शनासाठी पंकजा मुंडे पाथर्डीच्या दौऱ्यावर, उमेदवारी न मिळालेल्या पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष
6. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, पवारांनंतर फारुख अब्दुला आणि गोपालकृष्ण गांधींचाही निवडणूक लढण्यास नकार
7. परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा ईडीचं समन्स, सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
8. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींची आज सलग पाचव्यांदा चौकशी, काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
9. सांगलीच्या मिरजमधील एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष प्राशन करुन आयुष्य संपवलं, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती
10. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थिती, एबीपी माझावर विद्या माळवदे आणि अमृता फडणवीस यांची विशेष मुलाखत