1. महाराष्ट्रावरचं वीज संकट टळलंय, पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून वीज पुरवठा थांबवण्याचे आदेश मागे 


2. मुंबई पोलीसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज, 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज, भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती


मुंबई पोलीसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला आहे. 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे. 


3. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 9 वर्षे पूर्ण, पुण्यात निर्भय वॉकचं आयोजन, 9 वर्षांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी मोकाट असल्यानं संताप


4. दहीहंडी खेळताना काल दिवसभरात मुंबईत 111 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; 88 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज, 23 गोविंदांवर अजूनही उपचार सुरू


सोमालियात (Somalia) मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोहादिशूमधील (Mogadishu) आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


5. राज्यात काल दिवसभरात 2 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, तर नाशिकमध्ये गेल्या महिनाभरात स्वाईन फ्लूचे 11 बळी


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 ऑगस्ट 2022 : शनिवार : एबीपी माझा



6. मुंबईत कोरोनानं पुन्हा काढले डोके वर; दिवसभरात एक हजार 11 नव्या रुग्णांची नोंद, कोरोना रुग्णांची एकूण संख्या सहा हजाराच्या उंबरठ्यावर


7. डोक्यावर हात ठेऊन आजार बरं करण्याचा दावा करणाऱ्या औरंगाबादच्या बाबाचा पर्दाफाश, एबीपी माझा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलखोल


8. पालघरमधील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत माझानं दाखवलेल्या बातमीची प्रसासनाकडून दखल... जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची गाव-पाड्यांवर भेट, दोषींवर कारवाईचं आश्वासन


9. मथुरेच्या ठाकूर बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, सहा जण जखमी, मंगला आरती दरम्यान घडली दुर्घटना


10. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरीत तब्बल 14 तास सीबीआयची झाडाझडती, कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणात कारवाई