दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. नामिबियामधून 8 चित्ते घेऊन विशेष विमान भारतात दाखल, 5 मादी आणि 3 नरांचा समावेश, पंतप्रधान मोदींच्या हस्ते चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलं जाणार


2. कालप्रमाणे आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज,रात्रभर संततधार, उजनीतून विसर्ग वाढल्यानं पंढरपूरला पुराचा धोका


3. औरंगाबादमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री हैदराबाद मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमासाठी रवाना, मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिल्याची टीका, शिवसेना स्वतंत्र ध्वजारोहण करणार


Hyderabad Liberation Day : आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.  त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.  मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी 12000 कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


4. गृहपाठ बंद करण्याचा सरकारचा विचार, मात्र ठोस निर्णयापूर्वी होणाऱ्या घोषणांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम


5. रिफायनरीचा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीवरील कुठल्याही राज्यात किंवा दक्षिणेकडच्या राज्यातही होऊ शकतो, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री  हरदीप सिंह पुरी यांचं सूचक वक्तव्य


6.आजपासून नागपुरात अग्निवीर योजनेतंर्गत सैन्य भरती सुरु, विदर्भातील दहा जिल्ह्यांतील तरुणांसाठी संधी


7. काँग्रेसमधून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यावा, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाणांना आमंत्रण


8. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त आजपासून सेवा पंधरवडा, देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, तामिळनाडूत आज जन्मलेल्या मुलांना भाजपकडून सुवर्ण अंगठ्यांचं गिफ्ट


9.भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी, रत्नागिरीतील समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून 19 जणांची सुखरूप सुटका


10. 'जॉन्सन अँड जॉन्सन'चा परवाना रद्द, बेबी पावडर बालकांच्या आरोग्यासाठी घातक, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई