1. मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष 


2. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, मात्र राजकीय जवळीक साधण्यासाठी करण्यासाठी उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकरांच्या गळ्यात पडण्याची चर्चा


3. कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीचा पॅटर्न आता राज्यभर राबवणार, विधवा प्रथा बंद करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय


4. संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला, मुंबई पोलिसांचा जामीनाला विरोध तर संतोष धुरी आणि संदीप देशपांडे अद्याप फरार


5. ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सर्वेक्षण अहवाल  कोर्टात आज सादर होणार, भिंत तोडण्याच्या मागणीच्या अर्जावरही आज सुनावणी अपेक्षित 


6. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात 12 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ, आजपासून किंमत साडेतीन रुपयांनी महागला, व्यावसायिक वापराच्या सिलेंडर दरातही 8 रुपयांची वाढ


7. आसामपाठोपाठ बंगळुरूमध्येही पुराचं थैमान, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, हवामान खात्याकडून बंगळुरूला ऑरेंज अलर्ट


Assam Floods 2022 : आसासमध्ये पुरामध्ये भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पुराने हाहाकार माजला असून, तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 27 जिल्ह्यातील, जवळपास 6 लाखांहून अधिक लोकांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. 48 हजारांहून अधिक लोकांना 248 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. होजई आणि कचरला या जिल्ह्यांना सर्वाधिक पुराचा तडाखा बसला आहे.मदत मोहिमेअंतर्गत होजई जिल्ह्यातील 2 हजारांहून अधिक लोकांना लष्कराने सुरक्षितस्थळी हलवले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे राज्याच्या इतर भागातून संपर्क तुटल्यानंतर बराक खोऱ्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी आसाम सरकारचे प्रादेशिक एअरलाइन फ्लायबिग एअरलाइनच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली. 


8. पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, कोकण किनारपट्टीसहर राज्यातल्या अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचे


9. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना 5 लाखांचं विमा संरक्षण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 


10. अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, भारतातही रुग्णसंख्येत चढउतार कायम