दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1.महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, इम्तियाज जलील यांची राजेश टोपेंना विनंती


2.पंचवीस सत्ताधारी आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, रावसाहेब दानवेंचा दावा, निवडणुका लागताच इनकमिंग वाढेल, दानवेंना विश्वास


3. मविआला रामराम ठोकण्याच्या तयारीत असणाऱ्या राजू शेट्टींना चंद्रकांत पाटलांचं आमंत्रण, कोल्हापुरातील भाजप नेते शेट्टींच्या भेटीला, भाजप काय ऑफर देणार याची उत्सुकता


4. नाशिक निर्बंधमुक्त होणार, पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, मात्र ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार


5. पुण्यातल्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पामुळं पूरस्थिती ओढवण्याची पर्यावरणप्रेमींना भीती, जलसंपदा विभागाकडूनही प्रकल्पाला स्थगिती, राज्य सरकार राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 19 मार्च 2022 : शनिवार



6. पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल, कृषी उत्पन्न समितीची व्यापाऱ्यांवर कारवाई, आंब्याच्या 42 पेट्या जप्त
 
7. बदलापुरात 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नाचून घरी गेल्यानंतर काही वेळातच मृत्यू, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा


Badlapur News : शुक्रवारी धुलीवंदन सणाचा आनंद लुटून घरी आलेल्या एका तरुणाचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला.आशुतोश संसारे (वय 27) असे या दुर्देवी तरुणाचे नाव आहे. बदलापूरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आशुतोषच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. 


बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी असून इथे होळी-धुलीवंदनानिमित्त जल्लोष सुरू होता. यावेळी आशुतोष संसारेदेखील आपल्या मित्रांसह संगीताच्या तालावर सगळे नाचत होते. नाचून झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. आशुतोषला होणाऱ्या वेदना पाहता, त्याच्या पत्नीने मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


8. 25 मार्चला योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार तर केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा उपमुख्यमंत्रिपदी शपथबद्ध होणार


Yogi Adityanath Government Swearing  : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ केव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.  


9. 'द कश्मीर फाईल्स'चा सात दिवसांत 100 कोटींचा गल्ला, पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद


10. रशिया-युक्रेन युद्धाचा 24वा दिवस, दोन्ही देशांतील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ, रशिया आणखी आक्रमक, युक्रेनची चिंता वाढली