1. मुख्यमंत्री ऐनवेळी मतांचा कोटा ठरवणार, विधान परिषदेत राज्यसभेच्या निकालाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मविआचा सावध पवित्रा, शिवसेनेचा वर्धापन दिनही हॉटेल वेस्ट इनमध्येच साजरा होणार


2. पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपची रणनीती तयार, यावेळी देवेंद्र फडणवीस कोणती खेळी खेळणार याकडे लक्ष, दुपारी चार वाजता भाजप आमदारांचा क्लास


3. मेहबूब शेख यांच्यावरील आरोप प्रकरणात नवा ट्विस्ट, शेख यांच्यावरील आरोप करणाऱ्या तरुणीचं घूमजाव, तरुणीची चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार


4.आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज, मात्र ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही पुरेशा पावसाअभावी शेतीची कामं खोळंबली


5. आसामला पुराचा तडाखा, आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू तर 18 लाख नागरिकांना फटका


6. अर्धा जून सरला तरी पावसाची हुलकावणी, शेतीची काम खोळंबली, राज्यातील 18 जिल्ह्यात जूनच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद  


7. मुंबईकरांसाठी पोलिसांकडून हॅप्पी संडे उपक्रमाचं आयोजन, अक्षय कुमारनं दिला फिटनेस मंत्र, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचीही उपस्थिती


Mumbai Sunday Street : मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावं तसेच त्यांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यासारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरता मुंबई पोलिसांनी 'संडेस्ट्रीट' (Mumbai Sunday Street) संकल्पना राबवण्यात ये आहे. 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई पोलीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली आहे. आज मरीन ड्राईव्ह येथे 'संडेस्ट्रीट' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला आज मरीन ड्राईव्ह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार तसेच पोलीस सह आयुक्त ( का.व.सु ) विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली. 


एकूण 13 ठिकाणी 'संडेस्ट्रीट'
आज एकुण 13 ठिकाणी 'संडेस्ट्रीट' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचा उद्देश मुंबईकरांना घराबाहेर पडून मजा करता यावी, खेळ आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे.


अत्रिनेता अक्षय कुमारनं दिली 'ही' प्रतिक्रिया
अत्रिनेता अक्षय कुमारनं या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, 'आज या ठिकाणी येऊन मला आनंद झाला. कोविड काळात सर्वत्र शांतता होती. यानंतर दिसणार हे चित्र दिलासादायक आहे. ही संडेस्ट्रीट कल्पना कायम राहावी. केवळ रविवारीचं नाही तर दररोज व्यायाम करावा. सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या पोलीस दलातही अनेक कलाकार आहेत.'



 
8. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर बगळ्यांची हत्या करण्याचा प्रकार, अभिनेते सयाजी शिंदेंकडून घटना कॅमेऱ्यात कैद, प्रशासन मात्र ढिम्म
 
9. अग्निवीरांसाठी केंद्र सरकारची अजून एक मोठी घोषणा, संरक्षण मंत्रालयात नोकरीसाठी 10 टक्के आरक्षण, बिहारमध्ये हिंसक आंदोलन सुरुच , महाराष्ट्रातही पडसाद


10. फसवणूक प्रकरणी पाच बांधकाम व्यावसायिकांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई