1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत, ठाकरेंना धक्का देत 12 खासदारांच्या गटासह पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा करणार असल्याची माहिती


2. शिंदे गटाकडून नवीन कार्यकारिणीची घोषणा, ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्यांना नेतेपदाचा मान, कायदेशीर कारवाईचा संजय राऊतांचा इशारा


3. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान संपलं, मोदी, शाह, शिंदे, फडणवीसांनी बजावला मतदानाचा हक्क, तर काँग्रेस, राष्ट्रवादीची मतं फुटतील, शिंदे आणि फडणवीसांचा दावा 


4. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; महागाईविरोधात संसदेच्या प्रांगणात काँग्रेसचं आंदोलन


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) आजच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधक आक्रमक भूमिका घेणार असल्याची शक्यता आहे. महागाईसह इतर मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोमवारी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले होते. त्यामुळे संसदेत फारसे कामकाज झाले नाही. त्यामुळे आजपासून संसदेच्या अधिवेशनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. महागाई, रुपयाचे होणारे अवमूल्यन, बेरोजगारी या मुद्यांसह वनाधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांसह केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लागला असल्याचे चित्र होते. त्यानंतरही या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक एकत्र येणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 


5. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडाऱ्यात पूरस्थिती कायम, जनतेचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं आव्हान, उपमुख्यमंत्री चंद्रपूर, वर्ध्याला भेट देणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 19 जुलै 2022 : मंगळवार



6. धार बस दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांवर आज अंत्यसंस्कार, अनेक कुटुंबावर दुखाचा डोंगर, नर्मदा नदीत शोधकार्य सुरुच


7. अग्निपथ योजनेवरील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, योजना रद्द करण्याची मागणी 


8. रविवारी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान वाशिममध्ये वाद, शांताबाई गोटे विद्यालयात परीक्षेदरम्यान हिजाब काढण्यासाठी जबरदस्ती, पालकांचा आरोप


9. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या उंबरठ्यावर, महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन


10. प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घकालीन आजारामुळे मुंबईतल्या रुग्णालयात सुरु होते उपचार