दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. पुणे, बारामती आणि नगरला रात्रभर पावसाने झोडपलं, पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरुप तर परतीच्या पावसाचा सोयाबीन, कापसाला मोठा फटका


राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. पुण्यात (Pune) परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.


2. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त 100 रुपयात रेशनिंगची जाहीर घोषणा कागदावरच, निधी वितरित, मात्र धान्य दुकानावर पोहोचलाच नाही


3. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण, काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली भेट, ठाकरे-पवार सहभागी होणार का?, याकडे राज्याचं लक्ष


4. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर, सात उमेदवारांचं आव्हान


5. पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध, मंडप पाडण्यापेक्षा बदल करुन वापरात आणा, पंढरपूर मंदिर समिती सहअध्यक्षांची मागणी


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 18 ऑक्टोबर 2022 : मंगळवार



6. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कोठडी वाढणार की, जामीन मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष 


7. बीसीसीआयची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक, सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी होणार 36वे अध्यक्ष, आशिष शेलारांचीही खजिनदारपदी वर्णी लागणार


8. मुंबईत मुजोर टॅक्सी-रिक्षा चालकांना चाप बसणार, भाडं नाकारल्यास पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा


9. मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज बंद, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुरुस्ती काम, 6 तासांच्या विलंबामुळे विमानप्रवास खोळंबण्याची शक्यता


10. फुटबॉल जगतातील मानाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार यंदा करीम बेन्झिमाला, 1998 नंतर पहिल्यांदाच फ्रान्सच्या खेळाडूने मिळवला मान