दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. मविआ सरकारकडून अल्पमतात असताना नामांतराची घोषणा, आज कॅबिनेटमध्ये तिन्ही निर्णयांवर नव्यानं शिक्कामोर्तब करणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा


Maharashtra Cabinet : 14 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय होणार आहे. सोबतच बैठकीत मुंबई मेट्रोचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत.  मेट्रोचं काम लवकर व्हावं म्हणून सरकार निधी देण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारने (Shinde Govenment) स्थगिती दिली होती. औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad as Sambhajinagar) उस्मानाबादचे धाराशिव (Osmanabad as Dharashiv) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील (Navi Mumbai International Airport name after D B Patil) असं नामांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती आहे.


3. सुपर सीएम देवेंद्र फडणवीसच, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर माझ्या मुख्यमंत्र्यांना एखादी चिठ्ठी लिहिली तर गैर काय? राऊतांच्या टीकेनंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण


3. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू, तर गडचिरोलीतल्या पुरामुळे तब्बल 10 हजार नागरिकांचं स्थलांतर 


4. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ 8 ते 10 टक्के महागणार, महागाईच्या संकटात ग्राहकांना झटका तर व्यापारी संघटनांचा आज एक दिवसाचा देशव्यापी बंद


5. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज भाजपच्या संसदीय समितीची बैठक, बैठकीत एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. 


6.विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, पदावर दावा सांगत शिवसेनेचं विधिमंडळ सचिवालयाला पत्र तर राष्ट्रवादीकडून खडसेंचं नावही चर्चेत


7. माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका तर पालघर जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह पदाधिकारी शिंदे गटात


8. कोरोनावर प्रभावी औषध बनवण्यात यश आल्याचा ग्लेनमार्कचा दावा, नव्या नेझल स्प्रेमुळे ४८ तासांत कोरोना नष्ट होत असल्याचा दावा


9. संबंध बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


10. महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान, मुंबई विद्यापीठाची सुद्धा झेप