1. खातेवाटपानंतर आज पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक, उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व


2. खातेवाटपानंतर शिंदे गटातील काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा, मुख्यमंत्रीपद शिंदेंच्या हाती, मात्र 80 टक्के महत्त्वाची खाती फडणवीसांकडेच.. 


3. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंचं समर्थकांसमोर चिथावणीखोर भाषण, ठाकरे गटाची पोलिसांत धाव, तर संतोष बांगर यांच्याकडून अधिकाऱ्याच्या कानशिलात


4. हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलण्याच्या निर्देशावरून वाद..वंदे मातरम ऐवजी इतर शब्दही बोलू शकता... वादानंतर सुधीर मुुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, तर वंदे मातरमला रझा अकादमीचा विरोध


5. पावसाळी अधिवेशनात एकजूट कायम ठेवण्याचं विरोधकांसमोर आव्हान, विस्ताराला झालेला उशीर, अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि मेट्रोकारशेडवरुन सरकारला घेरण्याची रणनीती


राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज  महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद होणार आहे.


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑगस्ट 2022 : मंगळवार


6. अटलबिहारी वाजपेयी यांचं आज चौथा स्मृतिदिन, त्यांच्या समाधीस्थळी प्रार्थनासभेचं आयोजन, प्रार्थनासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांची उपस्थिती


7. उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचा फोन, मुंबईतील दहिसरमधून एक जण ताब्यात


8. कर्नाटकातील शिवमोगामध्ये सावरकर आणि टीपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरुन वाद, एकावर जीवघेणा हल्ला, शिवमोगात कलम 144 लागू


9. मुंबईच्या मुलुंडमधील दुमजली मोतीछाया इमारतीचा काही भाग कोसळला, दुर्घटनेत वृद्ध शुक्ला दाम्पत्याचा मृत्यू


मुंबईतील (Mumbai) मुलुंड (Mulund) इथल्या नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. 'ग्राउंड प्लस टू' असं या इमारतीचं स्ट्रक्चर होतं. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होतं. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे. 


10. खडकवासलामधून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू, पुण्यातील वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता, गोसीखूर्दमधून सुरु असलेल्या विसर्गामुळे गडचिरोलीत पूरस्थिती