Top 10 Maharashtra Marathi News :दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर उद्या राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती, पोस्टर्सवर राज ठाकरेंचा हिंदुजननायक असा उल्लेख


2. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टरवरुन वादंग, मुश्रीफ यांचं नाव रामासोबत जोडल्यानं भाजपची टीका, समरजितसिंह घाटगे पोलिसांत तक्रार करणार


3. ठाकरे परिवाराशी संबंधित कंपनीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार, किरीट सोमय्यांचा इशारा, दुपारी एक वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष


4. अॅड गुणरत्न सदावर्ते 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांच्या ताब्यात, पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी जयश्री पाटलांचाही मुंबई पोलिसांकडून शोध


वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्यभरात त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात (satara police) दाखल गुन्ह्याबाबत चौकशी होत असताना आता कोल्हापुरात देखील आज गुन्हा दाखल होत असल्याची माहिती आहे.  सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी कालच कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी भेट घेतली होती. आज कोल्हापुरात कुठल्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो. यासंदर्भात आज गृहमंत्री देखील भाष्य करु शकतात. 


सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. काल रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. ज्या ठिकाणी सदावर्ते यांना ठेवण्यात आलं आहे, त्याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


5. कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात, व्यावसायिक सच्चिदानंद कारीरा हत्या प्रकरण आणि अनेक व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी अटकेची कारवाई


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 15 एप्रिल 2022 : शुक्रवार



6. मुंबईतील नालेसफाईची कामं पूर्ण करण्यासाठी 30 मेपर्यंतचा अल्टिमेटम, पालिका आयुक्तांकडून कामाची ऑनफिल्ड पाहणी, मुंबईची तुंबई होणार नसल्याचं आश्वासन


7. महाराष्ट्रातलं हनुमान चालिसाचं लोण आता उत्तर प्रदेशात, उत्तर प्रदेशातील कासगंज आणि अलिगडमध्ये हनुमान चालिसा पठण


8. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बढतीत आरक्षण लागू करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली, मंत्रालयांना आकडेवारी गोळा करुन अंमलबजावणीचे आदेश


9. जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा, घटनास्थळी जाताना झालेल्या अपघातात लष्कराचे दोन जवान शहीद


10. रणबीर कपूर आणि आलिया भट लग्नबेडीत, मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा, लग्नानंतर आलियाची खास पोस्ट