1. जुलैमध्ये महाराष्ट्राकडून चांगली ऑफर, मात्र गुजरातला जाण्याचा आधीच निर्णय, 'वेदांता'चे अनिल अग्रवाल यांचं स्पष्टीकरण


2 .वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड, फडणवीसांनी मानले आभार; 3.5 लाख कोटी रुपयांच्या रिफायनरीला विरोध का, ठाकरेंना सवाल


वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. तर, सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थसाठी निराधार दावे केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 


3. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ युवासेनेकडून आज राज्यभर आंदोलन


4. निवडणूक आयोगासमोरील लढाईआधीच उद्धव यांना आणखी एक धक्का; दिल्ली, बिहार, गोवामधील प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात दाखल 


शिवसेना आणि  निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol) कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर (Election Commission Of India) होणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरू होणाऱ्या संघर्षा आधीच उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला आहे. मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास 8 राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. 



5. नवनीत राणा आणि रवी राणा यांना आज मुंबईतील बोरीवली न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, राजद्रोह प्रकरणी होणार सुनावणी


6. महात्मा फुलेंवरच्या चित्रपट निर्मितीत दिरंगाई करणाऱ्या एलोक्यन्स मीडियालाच पुन्हा कंत्राट, सत्तांतरानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाल्यानं चर्चांना उधाण


7. अखेर नंदुरबारच्या धडगावातील तरुणीच्या मृतदेहाचं मुंबईत जे जे रुग्णालयात शवविच्छेदन होणार, याच मागणीसाठी वडिलांनी 40 दिवसांनी मिठामध्ये ठेवला होता मृतदेह


8. हिजाब बंदीनंतर देशभरात १७ हजार विद्यार्थिनींनी शाळा सोडली, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान वकिलांची माहिती


9. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणी आज ईडीकडून अभिनेत्री नोरा फतेहची चौकशी,  अभिनेत्री जॅकलीनचीही झाली होती आठ तास चौकशी


10. टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील रॉबिन उथप्पाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निर्णय जाहीर