दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
१. दिल्लीतील मंदिरात राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा पठण, समर्थकांसह पदयात्रा काढून राणांचं शक्तिप्रदर्शन
Navneet Rana In Delhi : "महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचं अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पोहचले आहेत. राणा दाम्पत्यानी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले, यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी 'जय श्रीराम' च्या घोषणाही लगावल्या.
२. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा, भाजप, मनसे, एमआयएमचा समाचार घेणार, राणा दाम्पत्याला काय उत्तर देणार याकडंही लक्ष
३. घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, जूनमध्ये कोकण म्हाडाच्या बाराशे घरांसाठी सोडत, ठाणे-विरारमधील घरांचा समावेश
४. दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीत अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, १२ जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
५. औरंगाबाद शहरातील पाणीपट्टी चार हजारहून दोन हजार रुपये होणार, मंत्री सुभाष देसाईंचे महापालिकेला निर्देश, औरंगाबादकरांना मोठा दिलासा
६.'औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं स्वप्न मनसेचं पूर्ण करणार', बॅनरद्वारे मनसेचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
७.आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे थेट दुर्गम पाड्यावर,
८. शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात तर अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा दाखल
९.भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय
१०. थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारत सुवर्ण इतिहासाच्या उंबरठ्यावर, बलाढ्य डेन्मार्कचा ३-२ ने पराभव करत पुरुष संघाची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक