दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी ऋतुजा लटकेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पोटनिवडणूक उमेदवारीचं भवितव्य


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत (BMC) लिपिक पदावर नोकरीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही हा राजीनामा मंजूर केला नाही. त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात आज सुनावणी होणार असून आजच निर्णय अपेक्षित आहे. 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि तात्पुरत्या स्वरुपात दोन गट स्थापन झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवण्यासाठी लिपिक पदाचा राजीनामा महापालिका अधिकाऱ्यांकडे सोपवला. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 


2. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक भाजप लढवणार की शिंदे गट याचा सस्पेन्स कायम, लटकेंचा राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटाकडूनही 'प्लॅन बी' रेडी


3. स्वबळावर लढण्याची तयारी करा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना तर स्वतः दुसऱ्याच्या खुर्चीत बसणार नाही, सध्याच्या घडामोडींवरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला


4. मशाल अन्याय, गद्दारी जाळणारी, मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, मशालीचं तेज आणि महत्त्व लक्षात घ्या, ठाकरेंचं वक्तव्य 


5. 118 बडतर्फ एसटी कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं केली होती कारवाई


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 ऑक्टोबर 2022 : गुरुवार


6. सणासुदीच्या काळात महागाईनं डोकं वर काढलं, महागाईचा दर साडे सात टक्क्याच्या घरात, गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक


7. शाळा-महाविद्यालयातील हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निर्णय सुनावणार, सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष


8. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक अडचणीत, सीएमव्हीच्या प्रादुर्भामुळे शेकडो हेक्टरवरील पीक वाया जाण्याची भीती


9. भांडुपमध्ये पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया, पुढील एक दोन दिवस विक्रोळी, कांजूर मार्ग, भांडुप, घाटकोपरमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम


10. आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्याही रिंगणात, खजिनदारपदासाठी अर्ज दाखल; एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता, संदीप पाटलांचा अर्ज वैध