दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी समोर हजेरी लावताना राहुल गांधींची शक्तीप्रदर्शनाची तयारी, महाराष्ट्र काँग्रेसकडून ठिकठिकाणी मोर्चाचं आयोजन, कोरोनामुळं सोनिया गांधी रुग्णालयात


2. राज्यसभेनंतर विधान परिषदेसाठी राजकीय कुस्ती, अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस, काही सत्ताधारी आमदारांचाही फडणवीसांनाच पाठिंबा असल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा


3. राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष आजपासून सुरु, 15 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना, शालेय शिक्षण आयुक्तांचे शिक्षण संचालक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश 


4. आज निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान, त्र्यंबकेश्वरमधील दर्शनानंतर गावप्रदक्षिणा, पहिला मुक्काम सातपूर गावात


5. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात हाय अलर्ट, ठिकठिकाणी नाकाबंदी


PM Modi Visit To Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या म्हणजेच 14 जून रोजी पुण्यातील देहूमध्ये  (Dehu) येणार आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सूचनेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आल्यामुळे रात्री शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्ती, गाड्या यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कुठे कुठे आणि मध्यरात्री का प्रवास केला जात आहे याची माहिती घेतली जात आहे.


पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कोणताही घातपात घडू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी आणि खबरदारी घेतली जात आहे. हाय अलर्ट जारी केल्या मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षासह ट्रक, टेम्पो या वाहनांची तपासणी केली जात आहे. ते कुठून कुठे जात आहेत, कशासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, याची माहिती घेतली आहे. संपूर्ण दोन दिवस हा हाय अलर्ट मुंबईत असणार आहे. त्यामुळे रात्री शहराच्या विविध ठिकाणी मुंबई पोलीस गस्त घालत आहेत, नाकाबंदी करुन तपासणी करत आहेत.


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 जून 2022 : सोमवार : एबीपी माझा



6. सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी अखेर संतोष जाधव गजाआड, पुणे ग्रामीण पोलिसांची गुजरातच्या कच्छमध्ये कारवाई, 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी


7. पुण्यात यापुढे वाहतूक पोलीस तात्काळ दंड घेणार नाहीत, वाहनचालकांकडून बेकायदेशीर पैसे घेत असल्याने पोलीस आयुक्तांचा निर्णय, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई होणार


8. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ कायम, आज 1 हजार 803 कोरोना रुग्णांची वाढ, तर सद्यस्थितीत 10 हजार 889 कोरोना रुग्णांवर उपचार सूरू


9. सर्वसामान्यांचा ब्रेकफास्ट महागला, ब्रेडच्या किंमतीमध्ये 2 ते 5 रुपयांची वाढ, गेल्या पाच महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ


10. टी-20 मालिकेत टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे फलंदाज निष्प्रभ