1. ओबीसी राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी, बांठीया आयोगानं सादर केलेल्या इम्पिरिकल डेटावर भवितव्य अवलंबून


ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या पीठापुढे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही सुनावणी होणार आहे.. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची संख्या आणि राजकीय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठीया यांचा अहवाल राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात  सादर केलाय. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे.. या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे. दुसरीकडे 18 ऑगस्टला होणाऱ्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाविना याचा फैसलाही आजच्या सुनावणीवर अवलंबून आहे.. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. 


2. शिंदे आणि भाजपशी जुळवून घ्या, खासदारांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार मुर्मूंना पाठिंबा देण्याचीही मागणी


3. हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार, सदा सरवणकर आणि समर्थकांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा, तर दादरमध्ये उद्धव समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा


4. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभाध्यक्षांनी तूर्तास कोणताच निर्णय घेऊ नये, सुप्रीम कोर्टाचे आदेश, तर धनुष्यबाणासाठी शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव!


5. राज्यात आजही  पावसाचा जोर कायम राहणार,  रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोलीला आज रेड अलर्ट, मराठवाड्यासह चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 12 जुलै 2022 : मंगळवार



6. सप्तश्रुंगी गडावर ढगफुटीसदृश पाऊस, गोदावरीतल्या पूरस्थितीमुळं नाशकातल्या शाळा बंद, मराठवड्यात 387 गावांना पुराचा वेढा 


7. ढगफुटीनंतर ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु, बम बम भोलेचा गजर करत भाविक  बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना


8. आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा समावेश, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची आदित्य ठाकरेंना नोटीस, आदित्य ठाकरेंविरोधात नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार


9. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर एमआयएमचा आज मूक मोर्चा, इम्तियाज जलील यांची काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व पक्षांवर टीकेची झोड.


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज शहरात भव्य असा मूक मोर्चा निघणार आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलू नका अशी प्रमुख मागणी यावेळी मोर्चेकरी करणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्च्यात एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


10. शिर्डीमध्ये  आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, पुढचे तीन दिवस साईबाबांच्या शिर्डीत भक्तांची मांदियाळी